मराठी लोकगीत | Marathi Lokgeet Lyrics
अरे कृष्णा अरे कान्हा Are Krishna Are Kanha
अरे कृष्णा ! अरे कान्हा ! मनरंजनमोहना
आले संत घरीं तरी काय बोलुन शिणवावें?
उंस गोड लागला म्हणून काय मुळासहीत खावे?
प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस रहावे?
गांवचा पाटील झाला म्हणून काय गांवच बुडवावे?
अरे कृष्णा ! अरे कान्हा ! मनरंजनमोहना
देव अंगी आला म्हणून काय भलतेंच बोलावें
चंदन शीतळ झाला म्हणून काय उगळुनिया प्यावे
भगवी वस्त्रें केलीं म्हणून काय जगच नाडावें
आग्या विंचू झाला म्हणून काय कंठीच कवळावे
अरे कृष्णा ! अरे कान्हा ! मनरंजनमोहना
परस्त्री सुंदर झाली म्हणून काय बळेच ओढावी
सुरी सोन्याची झाली म्हणून काय उरींच मारावी
मखमली पैजार झाली म्हणून काय शिरीच बांधावी
अरे कृष्णा ! अरे कान्हा ! मनरंजनमोहना
सद्गुरू सोयरा झाला म्हणून काय आचार बुडवावा
नित्य देव भेटला म्हणून काय जगाशीं दावावा
घरचा दिवा झाला म्हणून काय आढ्याशी बांधावा
एका जनार्दनी ह्मणे हरी हा गुप्तची ओळखावा
अरे कृष्णा ! अरे कान्हा ! मनरंजनमोहना
अलीकडं डोंगर पलीकडं डोंगर Alikada Dongar Palikada Dongar
अलीकडं डोंगर पलीकडं डोंगर
मामाच्या गावाला
गाईगुरानं भरलाय गोठा
दह्यादुधाचा नसतोय तोटा
बाजरी ज्वारी पिकतिया भारी
मामाच्या गावाला
त्या गावाजवळ जेजुरी
तिथं नांदतो देव मल्हारी
त्याचं रहाणं शिखरावरी
त्याला नवलाख पायरी
वाघ्या मुरळी भंडारा उधळी
खंडोबा या देवाला
आले आले उन्हाळी दिन
चैत्र पुनवेचं चांदणं
दारी पोरं खेळतील छान
आणि दमून म्हणतील गाणं
महिन्याची सुट्टी शाळेला बुट्टी
सांगूया गोष्टी मामाला
माझ्या मामाचा तो संसार
मामी दिसते चंद्राची कोर
माझ्या मामीच्या अंगणात पोरं
जणू झाडाला लागल्यात बोरं
शिवारी सगळं मोत्याचं आगळं
पिकतंय् वर्षावर्षाला
मामा हाकितो डौलात मोट
मामी पाण्याला दाविते वाट
येता दिसं माथ्यावर नीट
होते न्याहरीला दोघांची भेट
नदीच्या काठी आमराई मोठी
आलीया मोहराला
अशी ही थट्टा Ashi Hi Thatta
बरी नव्हे थट्टा, बरी नव्हे थट्टा, बरी नव्हे थट्टा
भल्याभल्यास लाविला बट्टा, अशी ही थट्टा
ब्रह्मदेव त्रैलोक्याला शोधी
थट्टेने हरवली बुद्धी
केली नारदाची नारदी
अशी ही थट्टा
थट्टा दुर्योधनानं हो केली
पांचाळी सभेत गांजिली
गदाघावे मांडी फोडिली
अशी ही थट्टा
थट्टेने दुर्योधन मेला
भस्मासुर भस्म की हो झाला
वालीही मुकला प्राणाला
अशी ही थट्टा
थट्टा रावणाने त्या केली
सोन्याची लंका बुडविली
थट्टा ज्याची त्यास भोवली
बरी नव्हे थट्टा
थट्टेतून सुटले चौघेजण
शुक भीष्म आणि हनुमान
चौथा कार्तिकस्वामी जाण
त्याला नाही बट्टा
एका जनार्दनीं सर्वांला
थट्टेला भिऊन तुम्ही चाला
नाहीं तर नरककुंडाला
अशी ही थट्टा
असा जगाचा चाले हा खेळ Asa Jagacha Chale Ha Khel
असा जगाचा चाले हा खेळ, नाही कुणाचा कुणाला मेळ !
तेलही गेलं तूपही गेलं, अहो हातामध्ये धुपाटणं आलं
नको नको ते बळंच केलं, आगीमधून फुफाटी नेलं
उघड्यासंग नागडं गेलं, सारी रात ते हिवानं मेलं !
कारभार सम्दा ह्यो अनागोंदी, एक ना धड भाराभर चिंधी
खायाला आधी झोपाया मधी, अहो कामाला कधीमधी
चालत्या गाडीला घालिती खीळ, कुर्हाडीचा दांडा गोतास काळ !
द्राक्षाचा वेल लिंबावर गेला, कडू कसा तर संगतीनं झाला
हातच्या कांकणा आरसा कशाला, बैल गेला हो तो झोपा केला
जशी ही बुद्धी तशीच फळं, जावं त्या वंशा तेव्हाच कळं !
ज्याला हो चणं त्याला ना दात, बोलाची कढी बोलाचा भात
असतील शीतं जमतील भूतं, आंधळं दळतं कुत्रं पीठ खातं
काळ आला पण आली ना वेळ, पाण्यावाचून मासा तळमळं !
पहा जो खाई त्याला खवखव, गाढवाला काय गुळाची चव?
कुंपणापावेतो सरड्याची धाव, खोट्याच्या भाळी कुर्हाडीचा घाव
अर्ध्या हळकुंडी झालंय पिवळं, सुंभ जळं तरी जाईना पीळ !
न करत्याचा वार शनिवार, अहो शहाण्याला शब्दाचा मार
सांगितलं इथनं तुजला सारं की बुडत्याला काडी आधार
मोठ्या घराचा वासा पोकळ, उथळ पाण्या लई खळखळ !
आई उदे ग अंबाबाई Aai Ude Ga Amba Bai
आई उदे ग अंबे उदे, उदे
आई उदे ग अंबाबाई !
उदे उदे ग अंबाबाई
गुणगान लेकरू गाई
आई उदे ग अंबाबाई
तुळजापूरची तुकाई आई, गोंधळा ये
कोल्हापूरची लक्ष्मी आई, गोंधळा ये
मातापूरची रेणुका आई, गोंधळा ये
आंबेजोगाई जोगेश्वरी, गोंधळा ये
गुणगान लेकरू गाई
आई उदे ग अंबाबाई
आईची मूर्ती स्वयंभू वरी शोभली सिंहावरी साजरी
सिंहावरी साजरी हिर्यांचा किरीट घातला शिरी
चंडमुंड महिषासूर आईनं धरून रगडला पायी
आई उदे ग अंबे उदे, उदे
गुणगान लेकरू गाई
आई उदे ग अंबाबाई
आला नवरात्राचा महिना, आळवावा आईचा महिमा
आळवावा आईचा महिमा, त्याला काय सांगावी उपमा?
अहो, येळ साधुनी खेळ मांडिला, आशीर्वाद दे आई
आई उदे ग अंबाबाई
गुणगान लेकरू गाई
आई उदे ग अंबाबाई
शिवछत्रपतींची शिवाई, गोंधळा ये
शाहुराजश्रींची अंबाई, गोंधळा ये
विदर्भनिवासिनी चंडी-आई, गोंधळा ये
महाराष्ट्र कुलस्वामिनी आई, गोंधळा ये
गुणगान लेकरू गाई
आई उदे ग अंबाबाई
आई भवानी तुझ्या कृपेने Aai Bhavani Tujhya Krupene
आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला
अगाध महिमा तुझी माउली वारी संकटाला
आई कृपा करी, माझ्यावरी, जागवितो रात सारी
आज गोंधळाला ये
गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये
गोंधळ मांडला ग अंबे गोंधळाला ये
उधं उधं उधं उधं उधं
गळ्यात घालून कवड्याची माळ पायात बांधिली चाळ
हातात परडी तुला ग आवडी वाजवितो संबळ
धगधगत्या ज्वालेतून आली तूच जगन्माता
भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता
आई कृपा करी, माझ्यावरी, जागवितो रात सारी
आज गोंधळाला ये
गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये
गोंधळ मांडला ग अंबे गोंधळाला ये
उधं उधं उधं उधं उधं
अग सौख्यभरीला माणिकमोती मंडप आकाशाचा
हात जोडुनि करुणा भाकितो उद्धार कर नावाचा
अधर्म निर्दाळुनी धर्म हा आई तूच रक्षिला
महिषासुरमर्दिनी पुन्हा हा दैत्य इथे मातला
आज अम्हांवरी संकट भारी धावत ये लौकरी
अंबे गोंधळाला ये
गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये
गोंधळ मांडला ग अंबे गोंधळला ये
अंबाबाईचा.. उधं उधं उधं उधं उधं
बोल भवानी मातेचा.. उधं उधं उधं उधं उधं
सप्तशृंगी मातेचा.. उधं उधं उधं उधं उधं
आधी गणाला रणी आणला Aadhi Ganala Rani Aanala
आधी गणाला रणी आणला
नाहीतर रंग पुन्हा सुनासुना
धन्य शारदा ब्रह्म नायका, घेऊन येईल रूद्रविणा
साही शास्त्रांचा मंत्र अस्त्रांचा, दाविल यंत्र खुणाखुणा
नाहीतर रंग पुन्हा सुनासुना
सद्गुरू माझा स्वामी जगद्गुरू, मेरूवरचा धुरू आणाआणा
ब्रह्मांडा भवता तो एक सवता, दिवाच लाविल म्हणाम्हणा
नाहीतर रंग पुन्हा सुनासुना
माझ्या मनाचा मी तू पणाचा, जाळून केला चुनाचुना
पठ्ठेबापूराव कवि कवनाचा, हा एक तुकडा जुनाजुना
नाहीतर रंग पुन्हा सुनासुना
आली आली हो गोंधळाला Aali Aali Ho Gondhalala
जय तुळजाभवानीच्या नावानं चांगभलं
आली आली हो गोंधळाला आई
तुळजाभवानी माझी आई तुळजाभवानी आई
आई उधं ग तुळजामाई
तुळजाभवानी अंबाबाई
खुशीनं गोंधळाला आली रं तुळजाभवानी माझी
भक्ताच्या नवसाला पावली रं तुळजाभवानी माझी
मातीच्या कुडाची माझी साधी झोपडी
बसायला नव्हती घरात फाटकी घोंगडी
गुमानं भुईवर बसली रं तुळजाभवानी माझी
खुशीनं तेलाचा दिवा मी आता लावला
निवद देवीला भाजीभाकरी पावला
आवडीनं गुळपाणी प्याली रं तुळजाभवानी माझी
भवानी मी तुझा भक्त खरा
भुत्या-जोगती नाचनाचती
भक्तीची परडी सांभाळ डुगडुग ज्ञानरसाचा झरा
कवडीच्या माळा घालुनी गळा मागू जोगवा जरा
अगं येळेला धावुनी आली रं तुळजाभवानी माझी
आली आली हो भागाबाई Aali Aali Ho Bhagabai
तिनं साडी आणा म्हंटली, आणली !
तिनं चोळी आणा म्हंटली, आणली !
तिनं नथ आणा म्हंटली, आणली !
तिनं बुगडी आणा म्हंटली, आणली !
अहो दाजिबाच्या वाड्यात गडबड झाली
माडीवरची मंडळी खाली आली
आली आली हो भागाबाई
आली आली हो भागाबाई !
भागाबाई बोलली हटून
आणि लग्नाला बसली नटून
तिथं नवर्याचा पत्त्याच नाही
आली आली हो भागाबाई !
भागाबाई पडली ईरेला
ह्यो बापई नवरा ठरिवला
त्याच्या तोंडाला नाकच नाही
आली आली हो भागाबाई !
अशी आमुची भागाबाई शहाणी
तिच्या जल्माची झाली कहाणी
कडं पात्तूर एकलीच र्हाई
आली आली हो भागाबाई !
काठी न् घोंगडी घेऊन द्या की Kathi Na Ghongada Gheun
काठी न् घोंगडी घेऊन द्या की रं
मला बी जत्रंला येऊन द्या की
दिसं आलाय माथ्यावर, बघ दुपार झाली भर
त्या गोटमाळावर कुणबी सोडुनी नांगर
टाकी वैरण बैला म्होरं, घेतो विसावा घटकाभर
त्याची अस्तुरी सुंदर, आली घेउनी भाकर
पाय भाजत्याती चरचर अन् कशी चालतीया झरझर
कांदा न् भाकरी खाऊन द्या की रं
मला बी जत्रंला येऊन द्या की
पळपळून म्या चौखुर, वळती करून आणल्यात गुरं
हणम्या बैल हाय ह्यो माजूर, देतो झुकांडी जातो दूर
गाय कपिली लई चातूर, दूधदूध दियाला भरपूर
गुरं पाण्यावर नेऊन द्या की रं
मला बी जत्रंला येऊन द्या की
मी लोकाचा हाय चाकूर, जीव जमून होतोय चूर
धनी माझा लय् मगरूर, मालकीण करी कुरकूर
पायामंदी नाही खेटूर, चिंधी फाटतीया टुरटूर
अरं दुपार टळून जाऊन द्या की रं
मला बी जत्रंला येऊन द्या की
सदू सोनाराचा शिरीधर, मधु बामनाचा मुरलीधर
चोखू चांभाराचा चंदर, वरल्या आळीचा जालंधर
घराशेजारी आपली घरं, बाळपणातलं मैतर
अरं तुमच्यात सामील होऊन द्या की रं
मला बी जत्रंला येऊन द्या की
कावळा पिपेरी वाजवतो Kavala Piperi Vajavato
कावळा पिपेरी वाजवतो
मामा मामीला नाचवतो
लग्नाचा थाट तुम्ही कमी करा
हुंड्याची चाल आता बंद करा
कपड्याची फॅशन आवरा जरा
सुखाचा संसार आपला करा
घुमघुम गावात गाजवतो
मामा मामीला नाचवतो
मामीला झाली पोरं ही फार
खर्चानं झाला मामा बेजार
पोरांचा वाटतो नको हा भार
दोघांना पडला मनी विचार
त्रिकोण निशाण दाखवतो
मामा मामीला नाचवतो
ताडी-दारुला शिवू नका
सोन्याचा संसार बुडवू नका
देशाची दौलत उधळू नका
जनसेवेला विसरू नका
आपल्या देशाला वाचवतो
मामा मामीला नाचवतो
गणा धाव रे Gana Dhav Re
गणा धाव रे मना पाव रे
तुझ्या प्रेमाचे किती गूण गाऊ रे
तू दर्शन अम्हांला दाव रे
तुझ्या कृपेची छाया असू दे
ध्यानी-मनी नाम तुझे ठसू दे
माझी वादलात सापडली नाव रे
दूर किनारी हाय माझा गाव रे
गाडी चालली घुंगराची Gadi Chalali Ghungarachi
गाडी चालली घुंगराची, वाट बाई डोंगराची
वेळ कडक नि बाराची, वाट बाई डोंगराची
पहिल्यानं गाडीत बसले मी आज
कोकणात आहे माहेर माझं
आईबाप माझं दर्याचं राजं
मला सवय बंदराची, वाट बाई डोंगराची
दणक्यावर दणका बसतो ग बाई
दणक्यानं जीव हा व्याकूळ होई
तिकडच्या स्वारीला पर्वाच नाही
ह्या भयाण जंगलाची, वाट बाई डोंगराची
घरात वागे तशी दारात
रात्रीचा दिस करी दिसाची रात
भारी उताविळ ही पुरुषाची जात
आहे लबाड मुलखाची, वाट बाई डोंगराची
समोर दिसतंय् आपुलं गाव
कसं वाटं ना तुम्हाला भ्यावं
पुरे पुरे आता भास्करराव
ओढाताणी ही पदराची, वाट बाई डोंगराची
गोर्यागोर्या गालांवरी Gorya Gorya Galavari
गोर्यागोर्या गालांवरी चढली लाजंची लाली ग पोरी नवरी आली
सनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी ग पोरी नवरी आली
सजणी मैत्रिणी जमल्या अंगणी
चढली तोरणं मांडवदारी
किणकिण कांकणं रुणझुणु पैंजणं
सजली नटली नवरी आली
गोर्या गोर्या गालांवरी चढली लाजंची लाली ग पोरी नवरी आली
सनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी ग पोरी नवरी आली
नवर्यामुलाची आली हळद ही ओली
हळद ही ओली लावा नवरीच्या गाली
हळदीनं नवरीचं अंग माखवा
पिवळी करून तिला सासरी पाठवा
सजणी मैत्रिणी जमल्या अंगणी
चढली तोरणं मांडवदारी
सासरच्या ओढीनं ही हसते हळूच गाली ग पोरी नवरी आली
सनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी ग पोरी नवरी आली
आला नवरदेव वेशीला, वेशीला ग, देव नारायण आला ग
मंडपात गणगोत सारं बैसलं ग, म्होरं ढोलताशा वाजि रं
सासरी मिळू दे तुला माहेराची माया
माहेराच्या मायेसंगं सुखाची ग छाया
भरुनीया आलं डोळं जड जीव झाला
जड जीव झाला लेक जाय सासरा
किणकिण कांकणं रुणझुणु पैंजणं
सजली नटली नवरी आली
आनंदाच्या सरी तुझ्या बरसु दे घरीदारी ग पोरी सुखाच्या सरी
सनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी ग पोरी नवरी आली
आला नवरदेव वेशीला, वेशीला ग, देव नारायण आला ग
मंडपात गणगोत सारं बैसलं ग, म्होरं ढोलताशा वाजि रं
घबाड मिळू दे मला Ghabad Milu De Mala
घबाड मिळू दे मला रे खंडोबा, घबाड मिळू दे मला
अरं भंडारा वाहीन तुला रे खंडोबा घबाड मिळू दे मला
बारा कोसावर एक वाडी आहे, तिथं एक मारावाडी आहे
त्याचा मोठा वाडा आहे, अन् त्यावर महा दरोडा आहे
पावू दे मणभर सोनं मला रं, भंडार वाहीन तुला
मणभर सोनं ह्याले पाहिजे, कोणासाठी?.. स्वत:साठी
अन् खंडोबाले देणार काय? हळद नुसती दोन चिमटी !
बाप्पा हा सौदा झाला !
लेकरू होऊ दे मले ग मरिमाई, लेकरू होऊ दे मले
बकरू कापीन तुले ग मरिमाई, लेकरू होऊ दे मले
मी अन् माझ्या दोन सवती, कोन्या एकीलेही नाई संतती
त्यांच्या आधी कृपा कर माझ्यावरती
लोटांगण घालतो तुझ्या पायावरती
लेकरू होऊ दे हिला ग मरिमाई बकरू कापील तुला
दगडाचा देव, घेत नाही देत नाही
पापाची साथ कुणी करत नाही
नवसानं पोर कोणाले होत नाही
माणूस खादाड, देव काही मांगत नाही
देव म्हनता का धोंड्याला?
धान म्हनता का कोंड्याला?
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
चमके शिवबाची तलवार Chamake Shivabachi Talwar
पडली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी
रणात फिरली ना ती कधीच माघारी
चमके शिवबाची तलवार !
तळपत्या बिजलीचा अवतार
झेले ढालीवरती वार
पडली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी
रणात फिरली ना ती कधीच माघारी
तख्त-दौलतीसमोर केली ना लाचारी
कधी न झुकली ती दिल्लीच्या दरबारी
तमाम बादशाहीचा ताज तिने ठोकरला
मराठमोळ्याचा वेष तिने पांघरला
धर्मरक्षणासी सदा सज्ज भवानी झाली
जुलुमकर्त्याच्या रक्ताने ती न्हाली
महाराष्ट्रावर प्रेम अपार
उघडण्या स्वातंत्र्याचे द्वार
चमके शिवबाची तलवार !
शाहिस्तेखान म्हणाला दिल्ली दरबारी
"हुजुर करतो मी महाराष्ट्रावर स्वारी"
पुण्यात शाहिस्ता वस्तीला मग आला
शिवाजी लागे अजमावयास शत्रूला
शाहिस्त्याच्या घरात शिवबा रात्री शिरले
बघुन मर्द शिवा, खान मनी घाबरले
केला शिवबाने गनिमी काव्याने हल्ला
शाहिस्ता बोलतसे, "या तौबा, या अल्ला !"
केला शाहिस्त्यावर वार
त्याची तुटली बोटे चार
चमके शिवबाची तलवार !
तेव्हा अफझुलखाना क्रोध भारी मग चढला
कसम खाउनी घराबाहेरी तो पडला
"पहाड का चुहा है शिवाजी फिर भी बच्चा
मगर मैं बादशाह का बंदा हूं सच्चा"
बलिष्ट शत्रूला शिवबाने ओळखले
प्रतापगडाशी स्वत: भेटीला ते आले
"आओ मिलो हम से ।" म्हणुनी,
खान भिडे शिवबाला
करून धोका अफझुल करी वाराला
झाला शिवराया हुश्शार
केला क्षणात अफझुल ठार
चमके शिवबाची तलवार !
चल ग सये वारुळाला Chal Ga Saye Varulala
चल ग सये वारुळाला, वारुळाला, वारुळाला ग
नागोबाला पूजायाला, पूजायाला, पूजायाला ग
नागोबाचे अंथरूण निजले वरी नारायण
साती फडा उभारून धरती धरी सावरून
दूध-लाह्या वाहू त्याला, वाहू त्याला, नागोबाला
बारा घरच्या बाराजणी, बाराजणी, बाराजणी
रूपवंती कुंवारिणी, कुंवारिणी, कुंवारिणी
नागोबाची पुजू फणी, कुंकवाचा मागू धनी
राजपद मागू त्याला, मागू त्याला, नागोबाला
बाळपण त्याला वाहू, त्याला वाहू, त्याला वाहू ग
नागिणीचा रंग घेऊ, रंग घेऊ, रंग घेऊ ग
नागोबाला फुलं वाहू, लालमणी माथी लेवू ग
औक्ष मागू कुंकवाला, कुंकवाला, बाई कुंकवाला
चल रं शिरपा देवाची किरपा Chal Ra Shirpa
चल रं शिरपा, देवाची किरपा झालीया औंदा छान रं छान
गाऊ मोटंवरचं गाणं
चल माज्या राजा, चल रं सर्जा बिगीबिगी, बिगीबिगी डौलानं डौलानं
गाऊ मोटंवरचं गाणं
मोट चालली मळ्यात माज्या चाक वाजतंय कुईकुई
पाटाचं पाणी झुळझुळवानी फुलवित जातंय जाईजुई
धरतीमाता येईल आता नेसून हिरवं लेणं रं लेणं
गाऊ मोटंवरचं गाणं
गाजर मुळा नि केळी रताळी माघातला हरभरा
पडवळ काकडी वांगी वालपापडी मक्याचा डुलतोय तुरा
कोथमिर घेवडा सुवासी केवडा उसाचं लावलंय बेणं रं बेणं
गाऊ मोटंवरचं गाणं
उसाचं पीक आलंय जोसात औंदा
अरं देईल बरकत मिरची नि कांदा
वाटाणा भेंडी तेजीचा सौदा
खुशीत गातुया शेतकरी दादा
गव्हाची ओंबी वार्याशी झोंबी करतिया पिरमानं पिरमानं
गाऊ मोटंवरचं गाणं
चल सर्जा चल राजा Chal Sarja Chal Raja
चल सर्जा चल राजा, बिगी बिगी बिगी जायाचं
बिन मोलाचं बिन तोलाचं सौंगडी शेतकर्याचं
माथ्यावरती दिवसाचा ये डोळा, चल सर्जा
होय भुकेला शंभू हा हाय भोळा, चल राजा
भाकर कांदा झुणका रांधा, पोट भरे रायाचं
उडेल फेटा पळसाच्या रंगाचा, चल सर्जा
खण जरतारी आणिन मी भिंगाचा, चल राजा
तुजवर माळा घुंगुरवाळा, लेणं सौभाग्याचं
येईल आता चांदोबा आभाळी, चल सर्जा
होइल वेडी पारंब्यांची जाळी, चल राजा
कलत्या माना डुलक्या घ्या ना, टकमक नच पाह्याचं
जय गणनायक सिद्धीविनायक Jay GanNayak SiddhiVinayak
जय गणनायक, सिद्धीविनायक, सुखवरदायक तुज नमितो
गजमूख धारक, तू जग पालक, मी तव बालक तुज नमितो
गणगौळण झाली सुरू, पायी घुंगरू, लागे थरथरू, उडाली घाई
सूर तालाला मारी मिठी, दिठीला दिठी, फुटावी ओठी शब्दांची लाही
सभाजनांची झाली गर्दी, जमले बहु दर्दी, लागली वर्दी शिवाच्या कानी
गणगोत करुनी गोळा, नटेश्वर भोळा, की लगबग आला कैलासावरुनी
संगती बाळ रूपडे, गजानन पुढे, बघतो चहूकडे कौतुकापोटी
द्या वरदान रसिकावरा, तुमच्या लेकरा, आशीर्वाद करा, आस ही मोठी
तुम्ही उदार आश्रय दिला, म्हणुनी ही कला जगाला दिसली
अन् जोवरी तुमची कृपा तोवरी वाण आम्हाला कसली
जेजुरीच्या खंडेराया जागराला Jejurichya Khanderaya
जेजुरीसम पुण्यक्षेत्र या नाही धरणीवरी
अन् तिथे नांदतो सदानंद हर उंच डोंगरी गडावरी
यळकोट यळकोट जय मल्हार
जेजुरीच्या खंडेराया जागराला या या
वाईच्या तू गणराया जागराला या या
पसरणीच्या भैरी देवा जागराला या या
जेजुरीगडा वाजे चौघडा वाजे चौघडा
पुणं धरती ही पलिकडं, गड जेजुरी अलिकडं
रूप दावून बानू गेली, स्वारी देवाची येडी झाली
बानूबाईचं याड लागलं, मल्हारी देव मल्हारी
इसरून गेला कुण्या गावाला भंडारी देव भंडारी
येळकोट येळकोट बोलती हो नितकाय भंडार उधळती
नवलाख पायरी गडाला हो, चिरा जोडिला खडकाला
बोला हो तुम्ही बोला, म्हाळसा नारीला
अन् भंडारा वाहू देवाला हो मल्हारी रायाला
मल्हारी मल्हारी माझा कैवारी देव मल्हारी
गळा घालितो भंडारी देव मल्हारी
मल्हारी मार्तंड जय मल्हार
रुसला का मजवरी मल्हारी रुसला का मजवरी
बानू नार आणली घरी मल्हारी रुसला का मजवरी
लखलख दिवट्या जळती, पाजळली दीपमाळ
रुसला का मजवरी मल्हारी रुसला का मजवरी
कडेकपारी त्रिशूळ द्वारी वर उधळे भंडार
नाथ निरंजन सद्गुरू स्वामी घेतलासे अवतार
घेतलासे अवतार देवा लोटलासे भंडार
रुसला का मजवरी मल्हारी रुसला का मजवरी
मल्हार धनी मी म्हाळसा राणी
कर जोडुनी लागतो चरणी
प्रीत नको तुजवरी, प्रीत नको तुजवरी
रुसला का मजवरी मल्हारी रुसला का मजवरी
झुंजुमुंजु पहाट झाली JhunjuMunju Pahat Jhali
झुंजुमुंजु पहाट झाली, कोंबड्यानं बांग दिली
पूर्वेला लाली आली, धरतीला जाग आली
भिरिभिरिती रानीवनी पाखरं
जिवाचा मैतर ढवळ्या न् पवळ्या, शेताला घेऊन चालरं
धुकं पडलंया दाट, अंधारली ही वाट
घाटमाथ्यातुन वाहे पाट
सूर धरी ही मोट, किरकिरं रं हाट
पाणी ओढ्याचं ओढीते लाट
नागमोडीनं चालली ही वाट रं
रानफुलांचा घमघमतो वास रं
जिवाचा मैतर ढवळ्या न् पवळ्या, शेताला घेऊन चालरं
शेताच्या बांधावर, बांधाच्या झाडावर, झाडाच्या फांदीवर
फांदीच्या पानावर, पानाच्या घरट्यात लपून बसलंय कोण रं
त्याला गुंड्यानं गोफण हाण रं
जिवाचा मैतर ढवळ्या न् पवळ्या, शेताला घेऊन चालरं
दूर गेली नजर, डोईवरती पदर
घरची लक्षुमी शेतावर आली
तिनं आणली भाकर, खाऊन दिला ढेकर
गोडी न्यारीच चटणीला आली
तिच्या कष्टाचं मोल हे राख रं
नको विसावा नको ती झोप रं
जिवाचा मैतर ढवळ्या न् पवळ्या, शेताला घेऊन चालरं
डोकं फिरलंया बयेचं Doka Phiralaya Bayecha
डोकं फिरलंया बयेचं डोकं फिरलंया
हाताला धरलंया म्हणिते लगीन ठरलंया
हिला भरलंया न्यारं पिसं, ही पाही ना रातंदिस
साडी सोडून इजार नेसं, हिंडे घेऊन मोकळे केस
वारं भरलंया अंगात वारं भरलंया
हाताला धरलंया म्हणिते लगीन ठरलंया
मन नाही हिचं स्थिर, हिला राहिला ना धीर
नजरेचा मारते तीर, हिची नजर ती भिरभिर
भुतानं घेरलंया हिला भुतानं घेरलंया
हाताला धरलंया म्हणिते लगीन ठरलंया
काय सांगावी परवड, झोपेत ही बडबड
झाली घरात ही धडपड, बया झालीया वरचढ
कोंबडं आरलंया ज्वानीचं कोंबडं आरलंया
हाताला धरलंया म्हणिते लगीन ठरलंया
नवानवाच नखरा दावी मग बळंच म्हस्का लावी
सारं करून देते नावी सांगे संदीप तो अनुभवी
पाणी मुरलंया कुठंतरी पाणी मुरलंया
हाताला धरलंया म्हणिते लगीन ठरलंया
डोंगरी शेत माझं ग Dongari Shet Majha Ga
डोंगरी शेत माझं ग मी बेनू किती?
आलं वरीस राबून मी मरू किती?
कवळाचा भारा बाई ग, घेऊन चढावं किती?
गवताचा भारा बाई ग, घेऊन चढावं किती?
आडाचं पाणी बाई ग, पाणी वडावं किती?
घरात तान्हा बाई ग, तान्हा रडंल किती?
तान्ह्याचं रडं ऐकून पान्हा येईल किती?
आलं आलं वरीस जमीन नांगरून
उभं पीक नाचे सोन्यानं फुलवून
पर एक मेला सावकार कोल्हा
हिसकून घेतो बाई सोन्याचा गोळा
उपाशी राहून ग आम्ही मरावं किती?
म्हागाईनं बाई घातला हैदोस
गळा आवळी बाई बेकारी फास
कुनाचे देऊ आन् कुनाचं ठेवू
अशीच वर्सावर वर्सं जातील किती?
अक्षय र्हाया कुंकू कपाळा
संसारवेलीच्या फुलवाया फुला
रूप नवं आणू महाराष्ट्र भूला
जुलमाचे काच रावणी फास,
एकीचं निशाण हाती !
तुझा खर्च लागला वाढू Tujha Kharcha Lagala Vadhu
तुझा खर्च लागला वाढू, सांग कितिदा कर्ज काढू?
नको अशी मला तू नाडू, सांग कितिदा कर्ज काढू?
शिवली असती, झाली का नसती, घरात वापरायाला
नवीनच चोळी, थोडी फाटली, लागलीस फेकायाला
नको बळंच आणखी फाडू, सांग कितिदा कर्ज काढू?
घरखर्चाला, दर दिवसाला, दहाचा आकडा लागे
मिर्ची-मसाला नाही आजला, तू मध्येच ओरडून सांगे
म्हणे आणा बुंदीचे लाडू, सांग कितिदा कर्ज काढू?
तुझा ग भाऊ, तो ऐतखाऊ, आला तुला भेटाया
महिना झाला राहून त्याला, तो तयार होई नाही जाया
त्यात पाहुणा टपकलाय साडू, सांग कितिदा कर्ज काढू?
अशी तू उधळी, जगावेगळी, बायको मला मिळाली
तुझ्याच पायी लाचारीची वेळ आज ही आली
आईबापाला आता काय धाडू, सांग कितिदा कर्ज काढू?
Lagnachi Gani Marathi Lyrics | लग्नाची आणि हळदीची पारंपारिक गाणी
Lagnachi Gani Marathi Lyrics
| Marathi
आया पोकू बाया पोकू
आया पोकू बाया पोकू
पोकीन मामा मावश्या .... (4 times )
तीळ तांदळाने भरल्या माथन्या
एवढा शिंगार केला मायेच्या राणीया
आखण जाणे पोखण जाणे
पोखाण कोण जाणे व
सोयऱ्या घरची राणी
मीन पोखऱ्यासाठी आणि व
बाई बाई नाव घ्या
बाई बाई नाव घ्या
* * * *
कच्चा सुताच्या बाजूला
कच्चा सुताच्या बाजूला
टाकला देवाच्या दरबारी
कच्चा सुताच्या बाजूला
टाकला देवाच्या दरबारी
राम सोडती वासरं , लक्षिमन धोये गाई ..(2 times)
सीता माय दूध ताई , या दुधाची पिव्वी साय. .... .(2 times)
याचा वास स्वर्गी जाय .....(2 times)
तुमच्या लेका घरी शोभन. ....(2 times)
स्वर्गीच्या ( पूर्वजांचे नाव ) बा
तुम्ही येऊनी जाई जा ....(2 times)
अवघड रायाची चाकरी ....(2 times)
येन व्हये ना लवकरी ....(2 times)
बैलगाड्या भी जूप जा ....(2 times)
बहिणी भाच्या ले आण जा ....(2 times)
सोबत चालइ घेई जा ....(2 times)
दुरडी भरली देवता ....(2 times)
मांडव भरलासे गोता ....(2 times)
बाहेर निंघ व ( नवरीची/ नवरदेवाची ) माय ....(2 times)
वयखी घेव तूहय गोत ....(2 times)
सर्व आलं माहय गोत ....(2 times)
एक नाही आले (पूर्वजांचे नाव ) बा ....(2 times)
* * * *
सारवल्या ग भिंती, वर काढला गणपती
सारवल्या ग भिंती, वर काढला गणपती
काढला गणपती , वर काढला गणपती
नवऱ्या मुलाला ग बाई गणगोत किती ?
गणगोत किती ? बाई गणगोत किती ?
मांडवाच्या दारी वर काढली स्वस्तिक
काढली स्वस्तिक, वर काढली स्वस्तिक ...
काढली स्वस्तिका नवऱ्या मुलाचं कौतिक
मुलाचं कौतिक , नवऱ्या मुलाचं कौतिक
शुभ कार्य माझ्या घरी गणराया तुम्ही यावे
राया तुम्ही यावे, गणराया तुम्ही यावे
गाडी घुंगराची घेऊन संग शारदेला घ्यावे
शारदेला घ्यावे, संग शारदेला घ्यावे ...
वर माईच्या हातात शोभे कुंकवाची वाटी
कुंकवाची वाटी, शोभे कुंकवाची वाटी
मुहूर्ताला येण्यासाठी झाली देवतांची दाटी
देवतांची दाटी, झाली देवतांची दाटी
मांडवाच्या दारी हळदी कुंकवाचा सडा
कुंकवाचा सडा, हळदी कुंकवाचा सडा
तुळजापूरच्या आईला अधी ग मूळ धाडा
अधी मूळ धाडा, अधी ग मूळ धाडा ...
मांडवाच्या दारी चिखल कशाचा ग झाला
कशाचा ग झाला, चिखल कशाचा ग झाला
कशाचा ग झाला .. नवऱ्या मुलाचा बाप न्हाला
मुलाचा बाप न्हाला, नवऱ्या मुलाचा बाप न्हाला .....
मांडवाच्या दारी कोण फिरती गवळण ?
फिरती गवळण, कोण फिरती गवळण ?
फिरती गवळण, नवऱ्या मुलाची
मुलाची माळवण, नवऱ्या मुलाची माळवण
मांडवाच्या दारी करवल्या वीस तीस
करवल्या वीस तीस, करवल्या वीस तीस
सांगते बाई तुला आधी मानाचे खाली बस
मानाचे खाली बस, आधी मानाचे खाली बस ...
मांडवाच्या दारी हळदी बाईच वाळवण
बाईच वाळवण, हळदी बाईच वाळवण
हळदी बाईच वाळवण, नवऱ्या मुलाला केळवण
मुलाला केळवण, नवऱ्या मुलाला केळवण ....
मांडवाच्या दारी दुरडी भरली पानायाची
भरली पानायाची, दुरडी भरली पानायाची
भरली पानायाची, चूलती बोलवा मानायची
बोलवा मानायची, चूलती बोलवा मानायची ...
मांडवाच्या दारी कोण आहे ग हावशी
आहे ग हावशी, कोण आहे ग हावशी ?
आहे ग हावशी, नवऱ्या मुलाची मावशी ..
मुलाची मावशी .... नवऱ्या मुलाची मावशी ..
मांडवाच्या दारी... बाजा वाजतो पिरपिर
वाजतो पिरपिर .... बाजा वाजतो पिरपिर
वाजतो पिरपिर ... आजी नेसती आजचीर
नेसती आजचीर .... आजी नेसती आजचीर
मांडवाच्या दारी कासाराला लई मान
कासाराला लई मान ... कासाराला लई मान ...
कासाराला लई मान ... करी लग्नाचं चुडे दान
लग्नाचं चुडे दान... करी लग्नाचं चुडे दान
मांडवाच्या दारी उभी आहे ग कवाची
आहे ग कवाची, उभी आहे ग कवाची
आहे ग कवाची, वाट पाहते बंधूची ..
पाहते बंधूची ... वाट पाहते बंधूची ..
मांडवाच्या दारी, गलबला कशाचा झाला ?
गलबला बाई झाला... मामाचा टांगा आला ..
* * * *
जात्या ईश्वरा तुला सुपारी वाहिली
जात्या ईश्वरा तुला सुपारी वाहिली
सावळी मैना माझी नवरी हळद लागली
सावळी मैना माझी नवरी हळद लागली
हं हं हं ...... हं हं हं ......
जात्या ईश्वरा तुला सुपारी चा डाव
पार्वतीसाठी नवरे झाले ग महादेव.... महादेव
हं हं हं ...... हं हं हं ......
जात्या ईश्वरा तीळ तांदळाचा घाणा
सावळी नवरी माझी मोतीयाचा दाणा
मोतीयाचा दाणा ...
हं हं हं ...... हं हं हं ......
जात्या ईश्वरा तीळ तांदळाचा घोस
सावळी मैना माझी नवरी मोतीयाचा घोस
नवरी मोतीयाचा घोस...
हं हं हं ...... हं हं हं ......
लग्नाच्या दिवशी नको येऊ तू पावसा
उरकितो कन्यादान माझ्या मैनाचा मावसा
माझ्या मैनाचा मावसा
हं हं हं ...... हं हं हं ......
मांडवाच्या दारी सई बाई ग बाई ...
चिखल झाला चिखलाई.. झाला चिखलाई ...
चिखलाई. .. ..
न्हाली नवरीची आई ... नवरीची आई ग....
आई ...
हं हं हं ...... हं हं हं ......
मांडवाच्या दारी सईबाई ग बाई
चिखल कशान झाला .. कशानं गं झाला ...
झाला ...
बाप नवरीचा न्हाला ... ग नवरीचा न्हाला ..
बाई न्हाला ...
हं हं हं ...... हं हं हं ......
मांडवाच्या दारी सई बाई ग बाई ...
बुथली सांडली तेलाची, सांडली तेलाची ..
तेलाची ...
नवरीच्या बापाने धुळ मांडली मानाची...
मानाची ...
हं हं हं ...... हं हं हं ......
मांडवाच्या दारी सईबाई ग बाई ....
रुसला माझा भाया ग भाया ....
बाई भाया ....
पडते ग पाया शेवंती संग जाया ..
संग जाया ...
हं हं हं ...... हं हं हं ......
मांडवाच्या दारी सईबाई ग बाई ...
रुसला माझा दिर ग दिर .,.
बाई दिर ...
पडते ग पाया शेवंती संग जाया ...
संग जाया ....
हं हं हं ...... हं हं हं ......
मांडवाच्या दारी सई बाई ग बाई ....
जावा जावा चा रुसवा... जावाचा रुसवा ....
रुसवा ...
हं हं हं ...... हं हं हं ......
मांडवाच्या दारी सई बाई ग बाई ....
जाऊ बाई रुसलीस... बाई रुसलीस...
रुसलीस ..
भाऊचा पातळ ... मूड घरी नेसतुस ..
नेसतूस .....
हं हं हं ...... हं हं हं ......
मांडवाच्या दारी सई बाई ग बाई ..
आहेराची सोळा ताट , सोळा ताट
बाई ताट ...
भाऊचा पातळ, याचे रुंद रुंद काठ...
बाई काठ ...
हं हं हं ...... हं हं हं ......
मांडवाच्या दारी सईबाई ग बाई ..
अहिराची ठेला ठेली , ठेला ठेली
बाई ठेली...
भाऊचा पातळ मी तर वरचेवर झेली ...
बाई झेली ....
हं हं हं ...... हं हं हं ......
* * * *
पाच पानाचा ग विडा ... वर मोती याचा घोस
पाच पानाचा ग विडा ... वर मोती याचा घोस
वर मोती याचा घोस ....(2 times)
पाच पानाचा ग विडा ... वर मोती याचा घोस
आधी नेमीला गणेश ,
आधी पूजिला गणेश ...
आधी पूजिला गणेश .... ....(2 times)
हळकुंड सुपारी बाई बांधिते जात्याला
बांधिते जात्याला बाई बांधिते जात्याला ....
हळकुंड सुपारी बाई बांधिते जात्याला
मूळ चिट्टी धाडिते ग कुलदेवतेला ....
जात्या ईश्वरा तुला तांदळाचा घास
तुला तांदळाचा घास , तुला तांदळाचा घास
जात्या ईश्वरा तुला तांदळाचा घास
नवरा मोतीयाचा घोस.... ...(2 times)
जात्या ईश्वरा तुला सुपारीचा पाया
तुला सुपारीचा पाया , तुला सुपारीचा पाया
जात्या ईश्वरा तुला सुपारीचा पाया
अगं सिता मायी साठी नवरा झालाय रामराया. ...(2 times)
हळद आणि कुंकू आधी खंडोबा देवाईला
आधी खंडोबा देवाईला, आधी खंडोबा देवाईला
हळद आणि कुंकू आधी खंडोबा देवाईला
मग नवरीच्या बाबा आईला ...(2 times)
जात्या ईश्वरा तुला सुपारीचा पाला
तुला सुपारीचा पाला, तुला सुपारीचा पाला
जात्या ईश्वरा तुला सुपारीचा पाला
म्हाळसाबाई साठी नवरा झालाय खंडेराया ...(2 times)
जात्या ईश्वरा तुला सुपारीचा खांब
तुला सुपारीचा खांब, तुला सुपारीचा खांब
जात्या ईश्वरा तुला सुपारीचा खांब
अगं रुक्मिणीच्या साठी नवरा झालाय पांडुरंग
रुक्मिणीच्या साठी नवरा झालाय पांडुरंग ....
हळद दळायला ग सवाषिनी कोण कोण ?
सवाषिनी कोण कोण? सवाषिनी कोण कोण ?
हळद दळायला ग सवाषिनी कोण कोण ?
शंकराची पार्वती इठ्ठलाची रुक्मिणी ग ... (2 times)
हळद बाई आली कोण्या सवाषिनीच्या हाती ?
कोण्या सवाषिनीच्या हाती ? कोण्या सवाषिनीच्या हाती ?
हळद बाई आली कोण्या सवाषिनीच्या हाती ?
दळाया बैसली शंकराची पार्वती .. (2 times)
हळद दळीते मी खंडेरायाच्या नावाची
खंडेरायाच्या नावाची, खंडेरायाच्या नावाची
हळद दळीते मी खंडेरायाच्या नावाची
आई अंबाबाई आली करवली ग भावाची .. (2 times)
हळद दळाया मी बसले ग दाटी वाटी
बसले दाटी वाटी, बसले दाटी वाटी
हळदी कुंकवाच्या साठी
बसले दाटी वाटी,हळदी कुंकवाच्या साठी ....
मांडवाच्या दारी हळदी बाईचं वाळवण
हळदी बाईचं वाळवण , हळदी बाईचं वाळवण
मांडवाच्या दारी हळदी बाईचं वाळवण
नवऱ्या बाळाचं केळवण. .. (2 times)
लगीन एवढी चिठ्ठी देव बालाजीच्या नावा
देव बालाजीच्या नावा, देव बालाजीच्या नावा
मग सोयराच्या गावा
देव बालाजीच्या नावा, मग सोयराच्या गावा .. (2 times)
लगीन एवढी चिठ्ठी दिली जोतिबा देवाईला
दिली जोतिबा देवाईला, दिली जोतिबा देवाईला
लगीन एवढी चिठ्ठी दिली जोतिबा देवाईला
मग नवऱ्याच्या बाबा आईला,
नवऱ्याच्या बाबा आईला ...
दिली जोतिबा देवाईला, मग नवऱ्याच्या बाबा आईला ...
* * * *
मांडवाच्या दारी माझं धुराने भरलं डोळ
मांडवाच्या दारी माझं धुराने भरलं डोळ
धुरानं भरलं डोळं ....
माझं धुरानं भरलं डोळा
मांडवाच्या दारी माझं धुराने भरलं डोळ
बंधू च्या लग्नात जरी पातळ पायघोळ ...
मांडव घातीला सारा मांडव दवण्याचा
सारा मांडव दवण्याचा..
सारा मांडव दवण्याचा..
मांडव घातीला सारा मांडव दवण्याचा
लगीन करायाचं छंद नवऱ्याच्या मेवणीचा
लगीन करायाचं छंद नवऱ्याच्या मेवणीचा
मांडवाच्या दारी का ग वर माय काळी मोरी
का ग वर माय काळी मोरी
का ग वर माय काळी मोरी
मांडवाच्या दारी का ग वर माय काळी मोरी
तुझ्या बंधुच्या आहेराचा बाजा होतोय शिव वरी
तुझ्या बंधुच्या आहेराचा बाजा होतोय शिव वरी
हळद एवढं कुंकू देवी भवानी पाठयीवा
देवी भवानी पाठयीवा ...
देवी भवानी पाठयीवा
हळदी एवढं कुंकू देवी भवानी पाठयीवा
मग नवरा नटयीवा . मग नवरा नट यीवा
देवा भवानी पाठयीवा मग नवरा नटयीवा
मांडव घातिला सारा मांडव चाफ्याचा
सारा मांडव चाफ्याचा... सारा मांडव चाफ्याचा
मांडव घातिला चारा मांडव चाफ्याचा
लगीन करायचं छंद नवरीच्या बापयाचा
लगीन करायचं छंद नवरीच्या बापयाचा
मांडव घातिला सारा मांडव तुझ्या जाईचा
सारा मांडव जाईचा ... सारा मांडव जाईचा....
मांडव घातिला सारा मांडव तुझ्या जाईचा ..
लगीन करायचं छंद नवऱ्याच्या आईचा ....
लगीन करायचं छंद नवऱ्याच्या आईचा ....
मांडव घातीला सारा वेणीयीचा
सारा वेणीयीचा ... सारा वेणीयीचा
मांडव घातीला सारा वेणीयीचा
लगीन करायचं छंद नवऱ्याच्या बहिणीचा
लगीन करायचं छंद नवऱ्याच्या बहिणीचा
मांडवाच्या दारी दुरडी सुकली पानायाची
दुरडी सुकली पानायाची ....
दुरडी सुकली पानायाची ...
मांडवाच्या दारी दुरडी सुकली पानायाची
त्याची माता माऊली मानायाची
माता माऊली मनायाची ..
दुरडी सुकली पानायाची ... माता माऊली मनायाची ..
मांडवाच्या दारी हळदी बाईचा पाट केला
हळदी बाईचा पाट केला ..
हळदी बाईचा पाट केला ...
मांडवाच्या दारी हळदी बाईचा पाट केला
नवरा लिंबाचं पाणी न्हाला ..
नवरा लिंबाचं पाणी न्हाला ...
हळदी बाईचा पाट केला ...नवरा लिंबाचं पाणी न्हाला ...
मांडवाच्या दारी कोण वरमाय पाय धूती
कोण वरमाय पाय धूती
कोण वरमाय पाय धूती
नवऱ्या बाळाजीची तिची चुलती मान घेती
नवऱ्या बाळाजीची तिची चुलती मान घेती
वर माय एवढ व्हावं आई बापयं असताना
आई बापयं असताना ...आई बापयं असताना..
वर माय एवढ व्हावं आई बापयं असताना
बेंड मांडवी वाजयीतो मोर पैठणी नेसताना
बेंड मांडवी वाजयीतो मोर पैठणी नेसताना
Comments